
पणजी, दि.19 – बिहार, महाराष्ट्र, तमिळनाडू पाठोपाठ आता गोव्यातही मध्यान्न भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उसगाव येथील सरकारी शाळेतील बावीस विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून विषबाधा झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी पोंडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उसगाव येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी मध्यान भोजन घेतल्यानंतर बावीस विद्यार्थ्यांना पोटात मळमळण्यास सुरुवात झाली,उलट्या झाल्या. भोजन घेतल्यानंतर तासाभरात ही मुले आजारी पडली. या शाळेत शिशुवर्गापासून माध्यमिक वर्गापर्यंतचे शिक्षण दिले जाते. गोव्यामध्ये मध्यान भोजनातून विषबाधा होण्याची घडलेली ही पहिली घटना नाही. यापूर्वी जूनमध्ये् शाळा सुरु झाल्यापासून 86 मुलांना मध्यान भोजनातून विषबाधा होण्याच्या घटना घडल्या आहेत.
