सलमानवर आरोप ठेवण्याचा निर्णय बुधवारी

मुंबई: अभिनेता सलमान खानवर हिट अॅन्ड रन केसप्रकरणात २४ जुलैला आरोप निश्चित होणार आहेत. सलमानच्या उपस्थित शुक्रवारी हिट अॅन्ड रन केसप्रकरणाची सुनावणी झाली. सेशन कोर्टाने सलमानवर आरोप ठेवण्याबाबतचा निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या केसमध्ये जर सलमानवर आरोप सिद्ध झाल्यास, त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

कोर्टामध्येच सलमान सुनावणीच्या सुरुवातीला पब्लिक एरियात बसला होता. पण कोर्टाने त्याला आरोपीच्या पिंज-यात उभारण्याचे आदेश दिले. त्यामुळे सुनावणीदरम्यान सलमान आरोपीच्या पिंज-यातच होता. शुक्रवारी तासभर सुनावणी झाली.

सलमानच्या केसबाबत कोर्टासमोर दोन पर्याय आहेत. केस नव्याने सुरु करणे किंवा सध्याची केस पुढे सुरु ठेवणे असे दोन पर्याय कोर्टासमोर आहेत. कोणता पर्याय स्वीकारायचा, याबाबत अजून कोर्टाने शिक्कामोर्तब केलेले नाही. सलमानने २००२ साली कारने रस्त्यावर झोपलेल्या नागरिकांना उडवले आणि पळ काढला होता. या केसमध्ये जर सलमानवर आरोप सिद्ध झाल्यास, त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment