
पाटणा – बिहारच्या छपरामधील विद्यार्थ्यांमागील अपघाताची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाटण्यातील रुग्णालयात मुलांच्या वॉडमध्ये गॅस गळती झाल्यानं एकच गोंधळ उडाला. वॉर्डमध्ये असलेल्या एसीचा स्फोट झाल्यानं गॅस गळतीला सुरुवात झाली. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईंकाची धावपळ उडाली. दरम्यान, सर्वांना बाहेर काढण्यात यश आले असून सर्वजण सुखरुप असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. प्रत्यदर्शींच्या म्हणण्यानुसार एसीला आग
लागल्याची माहिती समोर आली आहे.