सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा, ‘नीट’ रद्द

नवी दिल्ली- मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या राज्यातील विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी आयोजित केलेल्या देशांतर्गत संयुक्त परीक्षाच अवैध असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आगामी काळात ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे.

त्यामुळे आता ‘नीट’ अर्थात नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट आता रद्द झाली आहे. यापुढे पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारतर्फे सीईटी आणि कॉलेजच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ही परीक्षा रद्द करण्यात यावी म्हणून काही विद़यार्थी आणी पालकांनी कोर्टात धाव घेतली होती.

नीट परीक्षेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत होती. पण हे नुकसान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आता आगामी काळात थांबणार आहे. गेल्‍या काही दिवसांपासून ही नीट’ अर्थात नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट रद्द करण्या त यावी अशी मागणी केली जात होती.

Leave a Comment