विठू दर्शनासाठी ऑन लाईन बुकींगला चांगला प्रतिसाद

पुणे दि.१८ – पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या वारकर्यांननी आता पंढरीत दाटी केली आहे. उद्या आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घडावे म्हणून तासन तास हे वारकरी प्रतीक्षेत असणार आहेत. यंदा यात्रेला नऊ लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी पंढरीत झाली आहे. मात्र या वेळच्या आषाढी दर्शनाचे विशेष म्हणजे १८ हजारांहून अधिक वारकर्यां नी विठूरायाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग केले आहे आणि नेहमीच्या दर्शनबारीबरोबरच ही ऑन लाईन बुकींगची रांग लावली जाणार आहे. त्यामुळे या वारकर्यांोना दोन ते तीन तासातच विठूदर्शन होऊ शकणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पुण्याचे विभागीय आयुत्त* प्रभाकर देशमुख म्हणाले की गेल्या वर्षी ऑन लाईन बुकींगची योजना प्रायोजिक तत्त्वावर राबविली गेली होती व गतवर्षी सुमारे १५०० जणांनी विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग केले होते. दरवर्षी वारीसाठी येणार्यान भाविकांच्या संख्येत वाढ होते आहे. आणि आषाढीच्या दिवशी केवळ विठूदर्शनाच्या ओढीने आलेल्या कित्येक लाख भाविकांना केवळ मुखदर्शन किवा कळसाच्या दर्शनावर समाधान मानावे लागते. त्यामुळे तिरूपती दर्शनाप्रमाणे पंढरपूर विठोबा दर्शनासाठीही ऑन लाईन बुकींग व्यवस्था केली गेली आहे.यंदा या योजनेला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

एकादशीदिवशी विठू दर्शनासाठी भाविकांची भलीमोठी रांग मध्यरात्रीपासूनच लागते. दरतासाला दोन ते अडीच हजार भाविक दर्शन घेऊ शकतात मात्र वारकरी इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने आलेले असतात की सर्वांना एकाच दिवसात दर्शन मिळूच शकत नाही. यासाठी ऑन लाईन बुकींग व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास असल्याचेही देशमुख म्हणाले.

Leave a Comment