नरेंद्र मोदी जातीवादी नाहीत – अण्णा हजारे

इंदौर – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे जातीवादी असल्याचे कसलेच पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांना जातीवादी म्हणता येणार नाही असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यप्रदेशातील एका कार्यक्रमात व्यक्त केले. मध्यप्रदेशात आपल्या लोकशाही यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अण्णा इंदौरला पोहचले. येथील एका कार्यक्रमात बोलताना अण्णा म्हणाले, की मला आता पर्यंत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते जातीवादी असल्याचे कसलेच पुरावे मिळाले नाहीत.’ अण्णा यांनी काँग्रेस तसेच भाजपा या दोन्ही पक्षांवर हल्ला केला असून ते म्हणाले, की मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. कोळसा घोट्याळामुळे पंतप्रधान देखील इमानदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.’ कोळसा घोटाळ्याच्या सीबीआय अहवालातही बदल करण्यात आले असून पंतप्रधानांनी या सर्व प्रकारामुळे राजीनामा द्यावा अशी मागणी ही अण्णांनी यावेळी केली.

Leave a Comment