महाजन यांची जागा मोदींनी घेतली

नागपूर- आगामी काळात होत असलेल्याल लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिले आहेत. भाजपची रणनीती ठरवण्यापासून उमेदवार निवडीपर्यंत, मोदींचाच शब्द अंतिम असेल. संघाने मोदींना मोकळे रान दिले असून तसा निरोप भाजप व संघ परिवारात फिरवला गेला आहे. २00४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किल्ल्या प्रमोद महाजनांच्या हाती होत्या. त्यानंतर प्रथमच सर्व सुत्रे मोदी यांच्याडकडे देण्यात आली आहेत.

दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी नागपुरातील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी एकांतात चर्चा केली. त्यात हा अलिखित ‘करार’ झाला असल्याचे समजते. त्यामुळेच प्रमोद महाजनांची जागा मोदींनी घेतली असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. २00४ च्या निवडणुकीत भाजपच्या किल्ल्या प्रमोद महाजनांच्या हाती होत्या. त्यानंतर आता हा सर्व कारभार मोदी यांच्या हाती देण्यात आला आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा नव्याने उचलण्यालाही संघाने हिरवी झेंडी दिली. मोदींनी नागपुरात पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या निवडणुकीपुरते राजनाथसिंग, लालकृष्ण अडवाणी इत्यादी नेते नामधारी झाले आहेत. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि मोदी या दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे या भेटीत दिसले. त्या्मुळे आता आगमी काळात भाजपचे यश-अपयश सर्व काही मोदी यांच्यावर आवलंबून राहणार आहे.