लॉर्डस, – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुस-या कसोटी सामन्या.स गुरवारपासून क्रिकेटची पंढरी लॉर्डस येथे सुरूवात होत आहे. ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाहुणा ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक असेल. तर दुसरीकडे ऍलिस्टर कूकच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा इंग्लंडचा संघ लय कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची कमकुवत बाजू फलंदाजी असल्यातचे उघड झाले आहे. शेन वॉटसन, ख्रिस रॉजर्स, मायकेल क्लार्क, एड कॉवन, स्टीवन स्मिथ यांना पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करता आलेली नाही. ब्रॅड हॅड्डीन, फिलीप ह्युजेस आणि पहिला कसोटी सामना खेळणार्यार ऍश्टन ऍगरने छाप सोडली असली तरी त्यांना विजय मिळवून देता आलेला नाही.
प्रशिक्षक डॅरेन लेहमनला वॉटसनकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असून तो दुस-या कसोटीत कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय कर्णधार मायकल क्लार्कच्या खांद्यावरही फलंदाजीची भिस्त असणार आहे.
दुसरीकडे कूकचा संघ फॉर्मात खेळतो आहे. कूकसहित जॉनाथन ट्रॉट, इयान बेल, केव्हीन पीटर्सन यांना फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे. शिवाय पहिल्या कसोटीत निसटता विजय मिळवल्यामुळे या कसोटीत ते निष्काळजी खेळ करणार नाहीत. स्टीवन फिन, जेम्स ऍण्डरसन, ग्रॅमी स्वॉन, टीम ब्रेसनन यांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखावे लागणार आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्डस येथे सुरू होणरा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.