स्वामी विवेकानंदांच्या पाऊलखुणांचा अमेरिकेत शोध

वॉशिग्टन दि.१७ -अमेरिकेतील भारतीय मूळ असलेल्या विद्यार्थी गटाने स्वामी विवेकानंद जेथे जेथे गेले त्या अमेरिकेतील सर्व ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. विवेकानंद एक्स्प्रेस या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात १०० विद्यार्थ्यांचा गट सहभागी झाला आहे.

हा गट सर्वप्रथम १९०० साली स्वामीजींनी जेथे भाषण केले त्या चर्च ऑफ ऑकलंडला जाणार आहे. कारण स्वामीजींच्या या पहिल्या भाषणानंतरच प्रंचड मोठ्या संख्येने लोक विवेकानंदांच्या संदेशाकडे आकर्षित झाले होते. त्याचे फलित म्हणून वेदांत सोसायटीची स्थापना त्यानंतरच करण्यात आली होती. हा तरूणांचा गट सॅन फ्रान्सिस्को, ऑकलंड, अल्मेडा अशा विवेकानंदांचा संबंध आलेल्या सर्व ठिकाणी भेटी देणार आहे. स्वामीं हिंदुत्व व भारत यांचे अमेरिकेतील दूत बनलेच पण त्यांचा उपदेश तरूणांना सहज स्वतःशी जोडून घेणारा आहे असे मत सिस्कोतील साईराम त्यागार्जून यांनी या संबंधात व्यक्त केले आहे.

Leave a Comment