सोशल मिडिया शिकवण्यासाठी गंमत जम्मत योजना

पुणे,दि. १ ७ : मोबा इल आणि सोशल मिडिया सेवा देत असलेल्या कंपन्यांना देशा च्या ग्रामीण भागात व्यवसाय वाढीस मोठा वाव असल्याचे लक्षात आले आहे . हेच सूत्र लक्षात घेऊन शालेय विद्यार्थी हे भविष्यातील ग्राहक असल्याने व्होडाफोनने महाराष्ट्रातील १ २ ० शाळांसाठी गंमत जम्मत ही अभिनव योजना राबविण्यास सुरुवात केल्याचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख इश्मि त सिंग यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

दोन दिवसापूर्वी फेसबुक ने इंटर नेट असोसिएशनच्या सहकार्याने दक्षिणेतील शाळात जागरूकता मोहीम राबवणार असे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर आज व्होडाफोन ने तोच मंत्र आळवला आहे. मात्र ही योजना महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. याची माहिती देताना श्री सिंगम्हणाले की चला भेटू या अशा प्रकारचे शिबिर शाळेत भरविले जाणार असून त्यात डाटा देवाणघेवाण कशी करायची ताचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ३ २ रुपयात गंमत जम्मत या नावाने व्हाउचर दिले जाणार आहे. सध्या कंपनीचे दोन्ही राज्यात एक कोटी ३ ४ लाख ग्राहक आहेत. त्यातील ६ ० टक्के ग्राहक ग्रामीण भागात आणि स्मार्टफोन वापरणारे आहेत. मात्र त्यांना त्याचा कमाल वापर कसा करावा हे माहिती नाही . तसेच मुलांना अभ्यासक्रम , पुढील प्रवेश, नोकरीच्या संधी याची माहिती क्लिकवर उपलब्ध होते हेही शिकविले जाणार आहे.

कंपनीने मुलांसाठी एक छोटी पुस्तिका करून दिली आहे. तीत उपकरणाचा सुरक्षित वापर कसा करावा याची मराठीत माहिती देण्यात आली आहे. नऊ ते १ २ वयोगटातील मुले हे या योजनेचे लक्ष्य आहे करमणूक, संवाद आणि माहिती मिळविणे हे तिन्ही हेतू यातून साध्य होतील असे नमूद करून ते म्हणाले की माहिती साठा आधारित सेवातून मिळणारा आमचा महसूल सात ते आठ टक्के आहे तो वाढेल आणि पर्यायाने व्यवसाय विस्तार केला जाईल. सहा फुट उंचीच्या भव्य सेल फोन प्रतिमेच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार आहे.

कोणाला काय मिळणार

१) इ मेल खाते कसे उघडावे
२) सर्च इंजिन कसे वापरावे
३) रेल्वे , बस तिकीट आरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण
४) एक महिना २ ० ० एम बी नेट वापर
५) शेतकरी, गृहिणी,बेरोजगारांना मार्गदर्शन

Leave a Comment