हैद्राबाद : मोदींची लोकप्रियता काँग्रेसला बघवत नाही; यामुळेच काँग्रेस पक्ष विनाकरण त्यांच्यावर टीका करत आहे. मोदींच्या सभेला तिकीट घ्यायचे की नाही? हे आमचा पक्ष ठरवेल. यात काँग्रेस पक्षाला आक्षेप घेण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात रविवारी झालेली मोदींची सभा अत्यंत यशस्वी झाल्याचा भाजपाचा दावा असून, मोदींची ही लोकप्रियता कॅश करण्याच्या नव्या कल्पना भाजपा नेत्यांना सुचत आहेत. येत्या 11 ऑगस्टला हैदराबाद येथे नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्यासाठी प्रदेश भाजपने 5 रुपयांचे तिकीट आकारले आहे. काँग्रेसचे मनीष तिवारी(केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री) यांनी या भाजपच्या या मुद्द्यावर कडाडून टीका केली.
एखाद्या बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठी 100 ते 1 लाख रुपये मोजावे लागतात. एखादा फ्लॉप चित्रपट पाहण्यासाठीही 200 ते 500 रुपये द्यावे लागतात. मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी 5 रुपये द्यावे लागतात. यावरुन बाजारात त्यांची खरी किंमत काय मुआहे, हे कळते. असे म्हणत तिवारी यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली होती.
तिवारी यांच्या टीकेला भाजपनेही चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. हे पाच रुपये मोदींची सभा ऐकण्यासाठी नाही तर उत्तरखंडमधील पूर ग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून गोळा करण्यात येणार आहेत. दुसर्यांवर टीका करण्यापेक्षा आपण मागील 50 वर्षांपासून देशाला फ्लॉप शो दाखवत आहेत याकडे जरा काँग्रेस
पक्षाने लक्ष द्यावे.
मोदींची लोकप्रियता काँग्रेसला बघवत नाही; यामुळेच काँग्रेस पक्ष विनाकरण त्यांच्यावर टीका करत असल्याचा पलटवार नायडू यांनी दिला आहे. मोदींच्या सभेसाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट छापण्यात आले नसून नोंदणीच्या माध्यमातुन 5 रुपये शुल्क गोळा करण्यात येणार आहे. या शुल्काच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम उत्तरखंडमधील पूर ग्रस्तांना मदत निधी म्हणून देण्यात येणारा आहे. प्रत्येकाने आपल्या स्वखुशीने हे शुल्क द्यावे. शुल्क न देणार्यांनाही मोदींच्या सभेला प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे.