मिकी आर्थरने केली कांगारूची गुपीत उघड

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांची काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षक पदावरून हाकलपट़टी करण्यात आली आहे. त्यामुळे मिकी आर्थरने ऑस्ट्रेलियन संघातील काही गुप्त गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली आहे. एका सामन्याअपूर्वी मायकेल क्लार्कने सलामीचा फलंदाज शेन वॉटसन हा राष्ट्रीय संघासाठी कर्करोग आहे, असे म्हटल्याचे मिकी आर्थरने जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अशेस मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी मिकी आर्थरची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्याळत आली आहे. आर्थर यांनी मेलबर्न येथील न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली असून त्यातून ड्रेसिंग रूममधील काही गुप्त गोष्टीही बाहेर आल्या आहेत. आर्थर यांची करार संपण्यापूर्वी दोन वर्षे आधीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्यामुळे आर्थर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुमारे ४० लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची मागणी आपले वेतन व भरपाई म्हणून मागितले आहे. आर्थर यांनी सादर केलेल्या या कागदपत्रांनुसार मायकेल क्लार्क व शेन वॉटसन यांच्यात विस्तव जात नव्हता. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा असल्यामुळे माझ्याबद्दल वर्णभेदही केला जात होता.

भारत दौ-यावर ऑस्ट्रेलियाची खराब कामगिरी झाल्यानंतर आर्थर यांच्यावर बरीच टीका झाली होती. संघाच्या शिस्तीवरूनही आर्थर यांना लक्ष्य करण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला कधीही पाठिंबा मिळाला नाही. भारताविरुद्धच्या तिस-या कसोटीत उपकर्णधार शेन वॉटसनसह चारजणांना वगळल्यावर संघटना आपल्या पाठीशी उभी राहिली नाही असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment