मुंबई- ‘डिसीजन रिव्हय़ू पद्धत अशेसमधील पहिल्या कसोटीनंतर आणखी वादात सापडली आहे. डीआरएस पद्धत ही तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे ही पद्धतीनुसार दिलेले निर्णय चुकीचे असू शकतात. त्याामुळे या ‘डिसीजन रिव्हय़ू पद्धती’ला (डीआरएस) हद्दपार करण्यापूर्वी आणखी काही सामन्यांची वाट पाहावी, असे मत माजी आंतरराष्ट्रीय अंपायर बोमी जमुला यांनी दिली.
‘डीआरएस’ पद्धतीला नकार देण्याऐवजी किंवा तिचा वापर टाळण्यापूर्वी या पद्धतीतील चुका टाळता येतील का, याचा विचार व्हावा, असे जमुला यांना वाटते. ‘डीआरएसला हद्दपार करण्यापूर्वी आणखी काही कसोटी सामन्यांची वाट पाहायला हवी. पुन्हा त्याच त्याच चुका होतात का, हे पडताळून पाहायला हवे,’ असे त्यांनी म्हटले. ‘डीआरएस’चा वापर अधिक प्रभावी होण्यासाठी अंपायर्सना अधिक प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अंपायर्स आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचेही जमुला यांनी यावेळी बोलताना स्पतष्टअ केले.
‘वेगवेगळय़ा प्रांतातून अंपायर्स येत असतात. इंग्लिश ही त्यांची प्राथमिक भाषा नसते. त्यामुळे अंपायर्स आणि पदाधिकारी (तिसरे, चौथे अंपायर) यांच्यात खूप गैरसमज वाढतो. अंपायर्सना नीट आणि चांगले प्रशिक्षण दिल्यास अंपायर्स आणि पदाधिकारी यांच्यात अधिक चांगला समन्वय साधता येईल,’ असे जमुला यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.