हिमेशच्या चित्रपटात दिसणार अभी-ऐश

आपल्या अनोख्या आवाजाने प्रसिध्द असलेला गायक-संगीतकार हिमेश रेशमिया आता पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या आगामी ‘मासूम’ चित्रपटामुळे. हिमेशचा ‘मासूम’ हा चित्रपट शेखर कपूर यांच्या सुपरहीट ‘मासूम’ या चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे आहेत.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमेशने या चित्रपटाच्या रिमेक बद्दल पूर्वीच चर्चा केली होती. शेखर कपूरच्या ‘मासूम’ या चित्रपटात नसहरुद्दीन शहा आणि शबाना आझमी यांची मुख्य भूमिका होती. तर हा चित्रपट एरिक सेगल यांच्या ‘मॅन वूमन अॅण्ड चाईल्ड’ या कादंबरीवर आधारीत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभि आणि ऐशने या चित्रपटास होकार दिला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बेदव्रता पेन हे करणार आहेत.

Leave a Comment