सलमान खान शुटिंगवेळी जखमी

बॉलीवूडचा दबंग सलमान खान शुटिंगवेळी जखमी झाला आहे. ‘मेंटल’ या सिनेमाचे शूटिंग दरम्यान त्या ला दुखापत झाली असल्या चे समजते. हैदराबाद येथे घरचेच प्रोडक्शन असणा-या ‘मेंटल’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली असल्यादचे समजते.

‘मेंटल’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या हैदराबादमधील रामोजीराव सिटीमध्ये चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान या चित्रपटाची शूटींग पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सलमानच्या डाव्या पायाला इजा झाल्याने तो जखमी झाला आहे. याआधी मार्चमध्येही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या हाताला इजा झाली होती.

‘स्टॅलिन’ या तेलगू सिनेमाचा रिमेक म्हणजे ‘मेंटल’ या सिनेमात सलमान व्यतिरिक्त डेझी शाहदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्युनिअर कलाकारांनी केलेल्या संपामुळे दोन महिने मेंटल यासिनेमाचे शूटिंग स्थगित करण्यात आले होते. शुटिंग सुरू झाल्यामनंतर सलमानला दुखापत झाल्यामने आता काही दिवस या सिनेमाचे शुटिंग थांबवावे लागणार आहे.

Leave a Comment