रॉयल बेबीचे नाव डेव्हीड ठेवावे – डेव्हीड बेकहॅम

लंडन दि.१६ – प्रिन्स विलियम्स आणि केट मिडलटन यांचे पहिले अपत्य आता कोणत्याही क्षणी ट्यँहा करणार आहे. तेथील प्रथेप्रमाणे बाळ जन्मास येण्याच्या अगोदरच त्यांचे नांव रूग्णालयाकडे नोंदवावे लागते. इंग्लंडच्या फूट बॉल टीमचा माजी कप्तान व प्रसिद्ध फूटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम याने रॉयल बेबी मुलगा असेल तर त्याचे नांव डेव्हीड ठेवले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विलियम्स आणि केट यांच्या शाही विवाहसोहळ्याला ज्या मोजक्या लोकांना निमंत्रण होते त्यात बेकहम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया यांचा समावेश होता. बेकहम आणि विलियम्स यांचे संबंधही चांगले आहेत. बेकहम म्हणतो, विलियम्स आणि केट चांगले मातापिता म्हणून सिद्ध होतीलच. पण त्यांचे जन्मास येणारे बाळ मुलगा असेल तर त्याचे नांव डेव्हीड ठेवावे कारण हे नाव खरच फार चांगले आहे. डेव्हीड नाव ठेवले गेले तर मला खूप आनंद वाटेल असेही तो म्हणतो.

३८ वर्षीय बेकहमने या वर्षाच्या सुरवातीलाच फूटबॉलमधून मिवृत्ती घेतली असून यापुढे पुढच्या पिढीत फूटबॉल खेळाचे प्रेम वाढविण्यासाठी आणि त्यांना फूटबॉल खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्याने जाहीर केले आहे.

Leave a Comment