रणभूमीची धूम 19 जुर्ले पासून

मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज नवनविन प्रयोग होतांना दिसताय, प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाताय, असेच काहीसे परंतु जरा हटके करताय, जे.जे. क्रिएशन्स प्रस्तुत जयंत गिलाटर निर्मित रणभूमी चित्रपटाचे कलावंत. विक्रम गोखले, अमोल
कोल्हे, उर्मिला कानेटकर, मनोज जोशी, निरंजन नामजोशी, उषा जाधव, शंतनू मोघे अशी स्टारकास्ट असलेला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलावंतांचा सहभाग असलेला हा महत्वाकांक्षी राजकीयपट रणभूमी चित्रपट 19 जुर्ले रोजी पासून पुणे आणि संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे,

शौनक शिरोळे दिग्दर्शित या चित्रपटाला साई – पियुष यांचे संगीत लाभले आहे.नुकतीच रणभूमीच्या कलावंतांनी पुण्याच्या महाविद्यालयांना भेट दिली. ज्यात हजारों विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला, चित्रपटातील अभिनेते अमोल कोल्हे यांनी काही ठिकाणी संवाद देखील साधला. चित्रपटाविषयी अभिनेते अमोल कोल्हे सांगतात की, आजवर कॉलेजविश्वावर अनेक चित्रपट आले परंतु त्यात प्रेमकथा आणि इतर बाबींचाच जास्त समावेश होता, परंतु रणभूमी चित्रपटांत हे प्रकर्षणाने टाळण्यात आले आहे. रणभूमी कथा आहे कॉलेजविश्‍वाची, त्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांची आणि कळत नकळत त्यांच्या होणार्‍या राजकीय प्रवासाची.

ही गोष्ट आहे संदिप देशमुख नावाच्या एका सामान्य तरुणाच्या भावविश्‍वाची, अतिमहत्वाकांक्षी राजकीय नेत्यांचा कॉलेजच्या निवडणुकीत समावेश होतो आणि नकळतपणे हा तरुण राजकारणात खेचला जातो, मग राजकीय बेरीज ष वजाबाकीच्या गणिताचा समावेश कॉलेजविश्‍वात होऊ लागतो, हा तरुण म्हणजेच अभिनेता अमोल कोल्हे. आबासाहेब पाटील (विक्रम गोखले) आणि तात्यासाहेब इनामदार (मनोज जोशी) हे राजकारणात प्रतिस्पर्धी आहेत, आबासाहेबांचा अतिमहत्वाकांक्षी सुपूत्र भाऊरावमुळे (शंतनू मोघे) संदिप राजकारणात येतो, आणि रश्मी (उर्मिला कानेटकर) जी कॉलेजमधील राजकारणात सक्रिय असते व तिच्या प्रेमाखातर अंकुश महाजन (निरंजन नामजोशी) राजकारणात येतो.युवा पीढीचा राजकीय प्रवास दर्शवणार्‍या या चित्रपटांत अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहे. कशाप्रकारे तरुण पीढी राजकारणात येते, युवा वर्गाने नेतृत्व करावे की नाही, राजकीय नेत्यांचा कॉलेजमधील निवडणुकीत वाढता प्रभाव असे अनेक प्रश्‍न आहेत.