हिरव्या कॉङ्गीच्या बिया वजन घटविण्यास उपयुक्त

लंडन – व्यायाम न करता आणि खाण्याची ङ्गार पथ्ये न पाळता वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉङ्गी बिन्स् म्हणजेच कॉङ्गीच्या बिया उपयुक्त ठरू शकतात, असे काही संशोधकांना आढळले आहे. कसलेही साईड इङ्गेक्टस् न होता शरीरातील चरबी कमी करण्याची क्षमता कॉङ्गीच्या या हिरव्या बियांमध्ये असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. कॉङ्गी हे पेय उत्तेजक समजले जात असले तरी या बिया मात्र उत्तेजक नाहीत आणि त्यामुळे हृदयाची गती वाढून त्याच्यावर ताण पडण्याचा धोका या बियांपासून नाही.

या बियांच्या औषधी गुणधर्माविषयी बरीच निरीक्षणे करण्यात आली आहेत आणि या बिया रक्तदाबावर उपकारक ठरतात, असेही निष्कर्ष हाती आले आहेत. त्यामुळे रक्तदाब कमी होतो, परंतु रक्तदाब कमी करण्याची प्रक्रिया होत असताना शरीराच्या चयापचय क्रीयांमध्ये कसलेही इष्ट आणि अनिष्ट बदल होत नाहीत असे या संशोधनातून दिसून आले आहे. म्हणजेच कॉङ्गी बिन्स्च्या या उपचारामध्ये कसलेही साईड इङ्गेक्टस् नाहीत.

या बियांचा हा औषधी गुणधर्म त्यातल्या क्लोरोजेनिक ऍसिड या घटक द्रव्यामुळे आहे. ते नैसर्गिक द्रव्य असून ते शरीरातली ग्लुकोज निर्मिती प्रतिबंधित करते. मात्र त्याच वेळी यकृतातील ज्यादा चरबीचे ज्वलन करून शरीराला कार्यरत ठेवण्याचे काम करते. कार्यक्षमतेत वाढ करते. असे असले तरी हे औषधी बी चवीला कडू असल्यामुळे ते गोळीच्या स्वरूपात घ्यावे, अशी सूचना संशोधकांनी केली आहे. ग्रीन कॉङ्गी बिन्स् संबंधीचे हे संशोधन मधुमेहविषयक एका नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment