महिला बँकेच्या मुख्याधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यम्

नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्ङ्गे स्थापन केल्या जाणार्‍या महिला बँकेच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारने उषा अनंतसुब्रह्मण्यम् यांची नियुक्ती केली आहे. उषा अनंतसुब्रह्मण्यम् या सध्या पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यकारी संचालिका आहेत. केंद्र सरकारने २०१३-१४ सालच्या अंदाजपत्रकात केवळ महिलांसाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन केली जाईल, अशी घोषणा केली होती. आता ती घोषणा प्रत्यक्षात आली असून या बँकेची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये आपल्या पहिल्या सहा शाखांसह या बँकेचा व्यवहार सुरू होईल.

ही बँक चालविण्यासाठी देशातल्या राष्ट्रीयीकृत बँकांतील महिला अर्थतज्ज्ञ संचालकांची एक गाभा समिती निर्माण करण्यात आली असून तिचे नेतृत्व उषा अनंतसुब्रह्मण्यम् या करणार आहेत. त्यांची नियुक्ती केंद्राच्या अर्थमंत्रालया कडून करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाकडून या नियुक्तीला मान्यता मिळताच ती अंतिम स्वरूपात जाहीर होईल. केंद्र सरकारने या केवळ महिलांच्या बँकेसाठी १००० कोटी रुपयांचे भागभांडवल देऊ केलेले आहे.

श्रीमती उषा अनंतसुब्रह्मण्यम् या पंचावन्न वर्षांच्या असून त्या १९८२ सालपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला बँक ऑङ्ग बडोद्यामध्ये स्पेशालिस्ट ऑङ्गिसर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांनी मद्रास विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून भारतीय संस्कृती या विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. बँक ऑङ्ग बडोदा आणि लाईङ्ग इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेची विमा सेवा सुरू करण्याच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या नंतर अनेक बँकांनी विमा सेवा सुरू केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला बँक सहा शाखांनी सुरू होणार असली तरी पहिल्या चार वर्षात तिच्या पाचशे शाखा काढण्यात येणार आहेत.

Leave a Comment