दिल्लीतून राहुल गांधीना मिळाली शेवटची तार

नवी दिल्ली दि.१५ – देशात १६३ वर्षांची सेवा बजावून बंद झालेल्या तारसेवेचा कालचा शेवटचा दिवस ठरला. या ऐतिहासिक व्यवस्थेने अखेरचा श्वास काल मध्यरात्री घेतला तेव्हा दिल्लीच्या सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस जनपथ येथून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेली तार ही शेवटची तार ठरली. दिल्लीच्या अश्विनी मिश्रा यांनी या तार ऑफिसमधून राहुल गांधी आणि दिल्ली दूरदर्शन न्यूजचे महासंचालक एस.एम.खान यांना शेवटच्या तारा केल्या असे समजते.

दिल्लीतील तार ऑफिसकडे काल अभूतपूर्व गर्दी झाली होती. तारांचे बुकींग घेतल्यानंतर दिवसात २१९७ जणांनी तार पाठविण्याचे अर्ज भरून दिल्याचे आढळले. रात्री ११.४५ मिनिटांनी कौंटर बंद करण्यात आले त्यात शेवटची तार राहुल गांधी याना पाठविली गेली. शेवटच्या एका दिवसांत तार विभागाने ६८,८३७ रूपयांचा महसूल गोळा केला असल्याचे तार अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment