क्वात्रोची गेला; पण बोङ्गोर्स संपणार नाही

नवी दिल्ली – १९८० च्या दशकात गाजलेल्या बोङ्गोर्स भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य आरोपी इटालियन व्यापारी ऑटोविओ क्वात्रोची याचे निधन झाले असले तरी त्याच्या पश्‍चात बोङ्गोर्स प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे. तेव्हा आता क्वात्रोची गेल्यामुळे आपल्या मागचा बोङ्गोर्स प्रकरणाचा ससेमिरा संपेल, अशा भ्रमात कॉंग्रेसच्या नेत्यांनी राहू नये, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीने केले आहे. ऑटोविओ क्वात्रोची हा या प्रकरणातला मुख्य आरोपी होता आणि या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची कुणकुण लागताच सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांनी त्याला तशी कल्पना दिली आणि देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे गांधी कुटुंब कायम संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

ऑटोविओ क्वात्रोची हा भारताबाहेर पळून गेल्यामुळे अटक करून न्यायालयात उभे करण्यात भारत सरकारला अडचणी आल्या आणि कॉंग्रेस सरकारने त्याची चौकशी करण्यात बरीच चालढकल केली. असा हा क्वात्रोची दोन दिवसांपूर्वी मरण पावला. त्याच्या कुटुंबियांनी तशी घोषणा केली. परंतु क्वात्रोची मेल्यामुळे बोङ्गोर्स प्रकरण संपेल असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी समजू नये. क्वात्रोची आणि गांधी कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते याचे पुरावे सीबीआयकडे आहेत आणि अजून तरी सीबीआयने या दोघांनाही क्लिन चीट दिलेली नाही. याची आठवण भाजपाचे प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.

बोङ्गोर्स प्रकरण कॉंग्रेस पक्ष, राजीव गांधी आणि गांधी कुटुंबासाठी ङ्गारच नुकसानकारक ठरले होते. त्यावरून राजीव गांधी यांचा १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन त्यांना सत्तेपासून दूर जावे लागले होते. ऑटोविओ क्वात्रोची याने आपण या प्रकरणात पैसे खाल्लेले नाहीत, असा खुलासा अनेकवेळा केला. परंतु तो तसे म्हणत असला तरी धाडसाने कधी चौकशीला सामोरा गेला नाही आणि सतत जगभर विविध देशात पळत राहिला. अर्जेंटिनामध्ये त्याला आश्रय मिळाला आणि कारवाईपासून अभयही मिळाले. म्हणून तो तिथे दीर्घकाळ राहिला. आता मात्र वयाच्या सत्तरीमध्ये असताना इटलीत मरण पावला.

Leave a Comment