अमेरिका चंद्रावर उभारणार नॅशनल पार्क

वॉशिग्टन दि.१५- कांही वर्षातच जगातले अनेक देश आणि खासगी संस्थाही चंद्रावर स्वारी करणार हे लक्षात घेऊन अमेरिकन लॉ मेकरनी बाकीच्यांची गर्दी चंद्रावर होण्याअगोदरच अपोलो मोहिमेतील याने चंद्रावर जेथे उतरली त्या जागेवर अपोलो ल्यूनर लँडींग साईट नॅशनल हिस्टॉरिकल पार्क उभारले जावे असे बिल यूएस काँग्रेसला सादर केले आहे. अपोलो ल्यूनर लँडींग लिगसी अॅक्ट नावाने हे बिल सादर केले गेले असून ते मंजुरीसाठी सायन्स, स्पेस टेकनॉलॉजी समितीकडेही पाठविले गेले असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने अपोलो मोहिमेतून पहिला मानव चंद्रावर उतरविला. अमेरिकेच्या इतिहासात अपोलो ल्यूनर कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहेच मात्र देशाची ती फार मोठी अचिव्हमेंटही आहे. बाकी देश वा खासगी संस्था चांद्रमोहिमा कोणत्याही क्षणी आखतील असे संकेत मिळत आहेत त्यावेळी अपोलो यान उतरले व जेथे जेथे अंतराळवीरांनी पावले टेकविली त्या जागेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे असे या लॉमेकरचे म्हणणे आहे. १९६९ ते १९७२ या काळात अमेरिकेच्या यानांनी जेथे जेथे चंद्रभूमीला स्पर्श केला ती सर्व जागा जपली गेली पाहिजे व त्यासाठी तेथे नॅशनल पार्क उभारले गेले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

Leave a Comment