हवेच्या प्रदूषणाने २० लाख मृत्यू

वॉशिंग्टन : जगात दरसाल हवेच्या प्रदूषणामुळे २ लाख लोक मरण पावतात असा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संशोधन संस्थेने काढला असल्याचे वृत्त चीनमधील झिनोव्हा या वृत्तसंस्थेने दिले आहे. या मृतांमध्ये दक्षिण आणि पूर्व आशियातील लोकांची संख्या मोठी असल्याचे या निष्कर्षात म्हटले आहे. अमेरिकेतील एन्व्हायरनमेंटल रिसर्च या संस्थेेने या संबंधात एक पाहणी केली आहे. हवाई प्रदूषणामध्ये प्रामुख्याने वाहनाच्या धुरातून सोडल्या जाणार्‍या विषारी वायूंचा समावेश होतो. हे वायू माणसांच्या ङ्गुफ्ङ्गुसात शिरतात आणि त्यांच्यामुळे विभिन्न प्रकारचे श्‍वसनाचे रोग विशेषतः कर्करोग होतो.

मानवी मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या विविध कारणांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यात जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि अन्नातले प्रदूषण हे समाविष्ट आहेत. परंतु मानवाकडून जाणीवपूर्वक केले जाणारे हवेचे प्रदूषण हे मानवी मृत्यूचे मोठेच कारण ठरलेले आहे. उत्तर कॅरोलिनामधील युनिव्हर्सिटी ऑङ्ग कॅरोलिना या विद्यापीठातील संशोधकांनी जगभरातली प्रदूषणाची आकडेवारी गोळा करून हा निष्कर्ष काढला आहे. मानवाने केलेल्या प्रदूषणामध्ये ओझोनचे वाढते प्रमाण हेसुध्दा समाविष्ट आहे. १८५० साली जगभरातच औद्योगिक युग सुरू झाले तेव्हापासून हे प्रदूषण वाढत चालले आहे.

केवळ वाहनांच्याच वापराने हवेचे प्रदूषण होते असे नाही. तर झाडे तोडल्यानेसुध्दा ते होते. त्यामुळे वाहनांची संख्या तुलनेने कमी असलेल्या दक्षिण आशियातसुध्दा हवाई प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे. हवामानात होणारा बदल हेसुध्दा हवाई प्रदूषणाचे कारण असू शकते. एवढे गंभीर कारण असूनसुध्दा आजपर्यंत त्यावर ङ्गार गांभिर्याने अभ्यास झालेला नव्हता. आता प्रदूषणाचा अभ्यास होत आहे परंतु मानवाकडून केल्या जाणार्‍या हवाई प्रदूषणाकडे फारसे लक्ष नाही.

Leave a Comment