बेनीप्रसाद वर्माची मोदीवर टीका

नवी दिल्ली: गुजरात दंगलीसंदर्भात मुख्यममंत्री नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर सध्या, राजकारण गरम झाले आहे. काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर काँग्रेससह सपा, डाव्यांनी जोरदार टीका केली आहे. येत्या काळात भाजपकडून पण बेनीप्रसाद वर्मा यांच्या वक्तंवयाचा समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे.

गुजरात दंगलीवेळी मी काहीही चुकीचे केलेले नाही, मी योग्यच निर्णय घेतले. मी हिंदू राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी असण्यात गैर काय ? असा सवाल, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रॉयटर्सच्या मुलाखतीत केला होता.

या मोदी यांच्या टीकेला प्रत्युचत्तसर देताना बेनी प्रसाद वर्मा म्हाणाले, आगमी काळात भारतातील जनताच नरेंद्र मोदीं यांना धडा शिकवेल. त्यांवचे वक्तव्यास त्यांच्य मुख्यामंत्री पदाला शोभेल असे नाही. त्यामुळे त्यांना मतदार त्यांची जागा दाखवतील.

आगामी काळात वर्मा यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याचा भाजपकडूनही समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपकडून याचे उत्तर कशा प्रकारे दिले जात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment