अशेस कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठयावर

नॉटिंगहॅम – अशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठयावर येवून ठेपला आहे. हा कसोटी सामना जिंकण्याससाठी इंग्लंडला हव्या आहेत केवळ चार विकेट तर ऑस्ट्रेलियाला १३७ धावांची गरज आहे. त्यामुळे इंग्लंड हा सामाना जिंकेल असे सर्वांना वाटते. या कसोटी मलिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शनिवारी इयान बेलचे शतक आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने दुस-या डावात सर्वबाद ३७५ धावा केल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३११ धावांचे आव्हाचन दिले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत धावांचा पाठलाग करताना दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने सहा बाद १७४ धावा केल्या होत्या . सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी इंग्लंडला चार विकेट तर ऑस्ट्रेलियाला १३७ धावांची गरज आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

दुस-या डावात ऑस्ट्रेलियाची सुरूवात निराशाजनक झाली. त्यांचे दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरले आहेत . कोवान, कर्णधार क्लार्क, स्टीव्हन स्मिथ, फिलिप ह्युजेस हे फलंदाज लवकर बाद झाले. त्या्मुळे कांगारूचा डाव अडचणीत आला आहे. त्यांच्याकडून केवळ सलामीवीर वॉटसनने ४६ तर रॉजर्सने अर्धशतक ठोकताना ५२ धावा काढल्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी ब्रेड हॅडिन ११ आणि अगर एका धावेवर खेळत होते.

Leave a Comment