रेणुका चौधरी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रवक्त्या

दिल्ली – राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या म्हणून काम पाहणार आहेत. त्या लवकरच महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दिले. राज्यातील कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य् आणण्याससाठी ही निवड करण्यादत आली असल्यालची समजते.

मुळच्यास आंध्रप्रदेशातील असलेल्यास रेणूका चौधरी या राज्यसभा खासदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत, त्यांनी नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दातील टीका केली होती.
जो माणूस स्वत:च्या बायकोला सांभाळू शकला नाही, तो राज्य काय सांभाळणार, असे रेणुका चौधरी मोदींना उद्देशून म्हणाल्या होत्या. त्यामुळेच त्यांची या पदावर वर्णी लागली असल्याचे समजते.

आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे संघटनात्मक अनेक फेरबदल केले जात असून रेणूका चौधरी यांची झालेली नियुक्ती या निवडणूकीचा भाग मानली जात आहे.

Leave a Comment