युवराज, झहीर करताहेत कमबॅकची तयारी

पॅरिस- अनफिट असल्याने संघाबाहेर असलेला अष्टपैलू युवराज सिंग आणि जलदगती गोलंदाज झहीर खान पुन्हा टीम इंडियात कमबॅक करण्या्साठी कसून तयारी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघे पण अनफिट असल्याने ते सध्या संघातून बाहेर आहेत. मात्र, भुवनेश्वरर कुमार, रविंदर जाडेजा अशा नवोदितांनी या प्रमुख खेळाडूंची अजिबात उणीव भासू दिली नाही. त्यामुळे दोघेपण आता पॅरीसमध्ये कसून सराव करीत आहेत.

युवराज, झहीरची या दोघांनाही आगामी २०१५चा वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळे ‘टीम इंडिया’त कमबॅक करण्याचे वेध लागलेले हे दोन क्रिकेटपटू पॅरिसमध्ये कसून सराव करीत आहेत.
कॅन्सरची लढाई जिंकणारा युवराज सिंग तेव्हापासून कधीच पूर्णत: फिट झालेला नाही. झहीर खानलाही कधी खांद्याच्या तर कधी मांडीच्या स्नायूने दगा दिलाय. त्यामुळे अलीकडच्या काळात हे दोघेही खेळाडू मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे युवी व झहीर हे दोघेही पॅरिसमधील प्रख्यात ट्रेनर टिम एक्सिटर यांच्याकडे फिटनेससाठी गेले आहेत.

सप्टेंबरमध्ये होणा-या स्थानिक मोसमात आपली तंदुरुस्ती सिद्ध करून ‘बीसीसीआय’च्या संघ निवड समितीचे लक्ष वेधण्याचा या दोघांचाही इरादा आहे. याबाबत बोलताना युवी म्हणाला, ‘सर्वप्रथम माझे लक्ष फिट होण्यावर आहे. मी झहीर भाई ट्रेनर एक्सिटर यांच्या सल्ल्याने कसून मेहनत घेत आहोत. त्यांच्याकडे फिटनेसचा जागतिक दर्जाचा सेटअप आहे.’

खराब फॉर्म अन् फिटनेसमुळे निवडसमितीने युवीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही संघात घेतले नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणा-या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याचा युवीचा इरादा आहे. झहीर खानलाही संघात परतण्यासाठी आता नव्या दमाच्या गोलंदाजांशी स्पर्धा करायची आहे.

Leave a Comment