भारतात स्टँडर्ड चार्टरला सर्वाधिक नफा

नवी दिल्ली दि.१३ – भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकात स्टँडर्ड चार्टर्ड बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे. या ब्रिटीश बँकेने एचएसबीसी आणि सिटी बँकेला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.

वास्तविक २०११-१२ या आर्थिक वर्षात ही बँक सिटी बँकेपेक्षाही नफा कमावण्यात मागे पडली होती कारण त्यावेळी त्यांच्या भारतातील नफ्यत घट झाली होती. मात्र २०१२-१३ वर्षात बँकेने व्याजदरातील वाढ, कॉस्ट कंट्रोल असे अनेक उपाय योजून आपल्या नफ्यात भारतात ७१ टक्के वाढ नोंदविली. कर आकारणी झाल्यानंतर या बँकेचा नफा २९६० कोटी रूपयांवर गेला असून तुलनेत एचएसबीसी व सिटी बँकेचा नफा अनुक्रमे १९३५ व २७१८ कोटी रूपये आहे.

यासंदर्भात बँकर्सनी दिलेल्या माहितीनुसार परदेशी बँकांनी आपले सारे लक्ष कॉस्ट मॅनेजमेंट वर अधिक केंद्रीत केले आहे. त्यांनी मोठ्या रकमेची डिपॉझिट्स न घेण्याचे धोरण राबविले आहे. त्या ऐवजी या बँका लो कॉस्ट करंट अकौंट, सेव्हींग अकौंट व कमी रकमेच्या डिपॉझिटवर भर देत आहेत.

Leave a Comment