प्रतापचा नवीन शत्रू कोण आहे?

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनची लोकप्रिय ऐतिहासिक मालिका भारत का वीर पुत्र – महाराणा प्रतापमध्ये लवकरच एक नवीन वळण येणार आहे, जे दर्शकांना थक्क करेल. शाम्स खानच्या विरुद्ध राणा उदय सिंगच्या विजयानंतर मेवाडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच हा विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराणी जयवंता बाई पूर्ण रिती-रिवाजासह राणा उदय सिंग व प्रताप यांचे स्वागत करते. राजमहलला उत्तमप्रकारे सजविण्यात आले आहे. तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण मेवाड आनंदामध्ये दंग आहे आणि प्रतापची प्रशंसा करत आहे.धामधूम व उल्हासामध्ये राणी भटियानीचे आगमन होते आणि ती प्रतापला ओरडते. कारण तिला प्रतापचे इतक्या लहान वयामध्ये जीव धोक्यात घालणे आवडत नाही.

राणी भटियानीच्या अशा वागण्याने सर्वजण अचंबित होतात. नंतर सर्वांना माहित पडते की राणी भटियानी किल्ल्यामध्ये नाही. राणी भटियानी मंदिरमध्ये भेटते. जेथे ती प्रतापच्या जीवाची रक्षा करण्याकरिता देवाला धन्यवाद देत असते. ती आपल्या हातावर जळता कापूर ठेवून प्रतापच्या प्रती आपले प्रेम दर्शविते. भटियानीच्या जखमांवर उपचार होतात आणि प्रतापला जाणीव होते की तो किती भाग्यवान आहे. साहसी प्रतापकरिता होणार्‍या प्रार्थना व प्रशंसेमध्ये एका शत्रूची नजर त्याचा पाठलाग करताना दिसून येते… हा नवीन शत्रू कोण असू शकतो. हा व्यक्ती प्रतापच्या विरुद्ध कट का रचतो आहे? जाणण्याकरिता पहा भारत का वीर पुत्र – महाराणा
प्रताप.

Leave a Comment