कैटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस

बॉलीवूडमधील हिट जोडी रणबीर-कैटरिना त्यांच्यातील अफेयर बाबत काहीच बोलत नाहीत. सध्या दोघेजण पण सुट़टीवर असून स्पे्नमध्ये हे दोघेजण एकत्रित फिरताना दिसत आहेत. कैटरिना १६ जुलैला २९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. हा वाढदिवस रणबीर-कैटरिना जोडी विदेशात एकत्रित साजरा करणार असल्यारचे समजते. त्यामुळे दोघांनी आता कितीपण अफेयर नसल्याचे सांगितले तरी आता त्यांच्याततील मधूर संबधाची सर्वांनाच खात्री पटली आहे.

काही दिवसांपूवीच रणबीर-कैटरिना दोघेही अलीकडेच दुबईत सुट्टी घालविताना दिसले होते. त्यानंतर ते दिग्दर्शक अयान मुखर्जीला भेटण्यासाठी युरोपला गेले. अर्जुन कपूर आणि करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी रणबीर-कतरिना जवळ आले.
काही दिवसांपूर्वीच लंडन दौ-यावर असताना कैटरिना आणि रणबीरची आई नीतू सिंग एकत्र डिनर करताना आढळल्या होत्या. त्यामुळे नीतू सिंगचेही कैटरिनाशी चांगलेच जुळत असल्याचे दिसते.

हृतिकच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेमुळे कतरिनालाही ‘धूम ३’च्या चित्रिकरणातून सुट्टी मिळाली आहे. त्याकमळे ती १६ जुलैला तिचा वाढदिवस रणबीर सोबत साजरा करणार आहे. त्याठिकाणहून परतल्यांनतर पुन्हा ‘धूम ३’चे शुट करणार असल्याचे समजते.

Leave a Comment