
नुकताच येऊन गेलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा नवीन सिनेमा येऊ घातलाय.‘प्रेमाची गोष्ट’या सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी आणि दिग्दर्शक-लेखक सतीश राजवाडे ‘पोपट’ या सिनेमासाठी एकत्र येत आहेत. सोबतच या सिनेमात अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन,केतन पवार, अनिता दाते, नेहा शितोळे, मेघा घाटगे या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मिराह एन्टरटेनमेंट प्रा.लि. प्रस्तुत आणि सिट्रस चेक इन्स ह्यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या ह्या चित्रपटाची निर्मिती `मिराह एन्टरटेनमेंट’ने केली आहे. नुकतीच ‘पोपट’ या सिनेमाची घोषणा दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एका सोहळ्यात केली. येत्या २३ ऑगस्टला हा सिनेमाच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.