लखनभैय्या इन्कांउटर प्रकरण; 21 आरोपींना जन्मठेप

मुंबई- रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया बनावट चकमक प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सुर्यवंशी याच्यासह 21 जणांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये सहा पोलीस अधिकारी, सात अंमलदार आणि अन्य आठ जणांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, विनायक शिंदे, तानाजी देसाई, रत्नाकर कांबळे, शैलेंद्र पांडे, अकिल खान, हितेश सोलंकी, मनोज मोहनराज, सुनील सोलंकी, नितीन सरतापे, मोहम्मद शेख, देवीदास सकपाळ, जनार्दन भणगे, दिलीप पालांडे, प्रकाश कदम, गणेश हरपुले, आनंद पाताडे, पांडुरंग कोकम, संदीप सरदार, सुरेश शेट्टी, अरविंद सरवणकर अशी या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान न्यायालयाने प्रदीप शर्माची 10 हजारच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. मात्र 6 महिने देशा बाहेर जाता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment