पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, दि. 12 – गेला आठवडा दडी मारलेल्या पावसाने जोराची हजेरी लावली. पुण्यासह राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तापमानही कमी आले आहे. पुढील दोन दिवसात कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वेध शाळेने सांगितले आहे.

प. बंगाल व ओडिशा लगतच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड व छत्तीसगडच्या भागावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीवर दक्षिण गुजरात किनाराट्टीपासून ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गेल्या 24 तासात नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यात सक्रीय आहे. विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद आहे. वेध शाळेच्या नोंदी नुसार मागील 24 तासात कोकणात तळा (21), खालपूर (20), पालघर (19), कर्जत (17), माथेरान आणि श्रीवर्धन (15) मिली मिटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर (15), गगनबावडा (11), पेठ (8), वडगाव (7), पुणे (2) तर शाहूवाडी, भुउदरगड, चांदगड येथे (5) मिली मिटर पावसाची नोंद आहे. विदर्भात भामरागड (25), सिरोंचा (12), सालेकासा (9), चंद्रपूर, आमगाव, कोर्ची (8), देवरी, गडचिरोली (7) मिली पाऊस नोंदवण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी (4), देगलूर, पूर्णा, उदगीर, निलंगा, लातूर, रेणापूर येथे (3) मिली मिटर पाऊस झाला आहे येत्या 48 तासात कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
——————————-

Leave a Comment