दगडुशेठला चामुंडेश्‍वरी मंदिराचा देखावा-1 लाख 60 हजार दिव्यांची रोषणाई

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – पुण्याचा गणेशोत्सव आता साता समुद्रपार पोहचला आहे. गणेशोत्सवासाठी राज्यातूनच नव्हेतर देश – विदेशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीमंत दगडुशेट हलवाई गणपती ट्रस्टचा देखावा. मंडळाच्या वतीने यंदा म्हैसुरच्या प्रसिद्ध चामुंडेश्‍वरी मंदिराचा देखावा उभारण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी दिली.

गणेशोत्सवाला दोन महिन्यांचा कालावधी असला तरी श्रीमंत दगडुशेट गणपतीच्या देखाव्याची तयारी सहा महिने अधीच सुरू झालेली असते. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाची भव्य प्रतिकृती उभारणे हे खास वैशिष्ट्ये मंडळाने जपले आहे. गणॅशोत्सवाला तीन महिने बाकी असतानाच मंडळाच्या सारसबाग येथील सजावट विभागात देखावा उभारण्याची जोरदार तयारी सूरू झाली आहे. 5 सप्टेबर पर्यंत हा देखावा पूर्णपणे तयार होणार आहे असे खटावकर यांनी सांगितले.

मंडळ यंदा म्हैसुर येथील प्रसिद्ध चामुंडेश्‍वरी मंदिराचा देखाव उभारत आहे. हा देखावा तब्बल 110 फूट उंच, 90 फूट लांब आणि 58 फूट रूंद इतका भव्य आहे. प्लायवुड आणि लाकडाचा वापर करून हा देखावा तयार करण्यात येत असून यामध्ये फ्लेझीबल प्लायचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचे खटावकर यांनी सांगितले. देखाव्याचा गाभारा पूर्णपणे दाक्षिणात्य पद्धतीने साकारण्यात येत आहे. या देखाव्याला भव्य विद्युत रोषणाईची सजावट लाभले असून यामध्ये 1 लाख 60 हजार दिव्यांची विद्युत रोषणाई असणार आहे हे सर्व दिवे एलईडी आहेत. हा देखावा अत्यंत आकर्षक व भव्य करण्यासाठी खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साठ लोक काम करत आहेत, तर पेंटींगचे काम करण्यासाठी खास राजस्थानमधुन कारागीर आणण्यात आले आहेत.

Leave a Comment