पनामा सिटी : तंबाखूचा वापर आरोग्यास धोकादायक असतो असे इशारे वारंवार देऊनसुध्दा लोक तंबाखूपासून दूर राहत नाहीत. त्यामुळे दरसाल ७ लाख लोक तंबाखूपासून होणार्या विविध विकारांमुळे जीवास मुकतात. अशा प्रकारे मरण पावणार्या लोकांमध्ये गरीब देशातले लोक मोठ्या संख्येने असतात. असे जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे. तंबाखूचा वापर थांबला नाही आणि तो असाच वाढत गेला तर २०३० सालपर्यंत या विकारांनी मरणार्यांची संख्या दरसाल ८० लाखावर जाईल, असाही इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
तंबाखूमुळे दरसाल ६० लाख मृत्यू
२०३० साली मरणार्या या लोकांमध्ये ८० टक्के लोक गरीब देशातील असतील असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहलवालात म्हटले आहे. तंबाखू, जर्दा, गुटखा, सिगारेट, विडी यांचे उत्पादन करणार्या कंपन्या मृत्यूचे हे तांडव माहीत असूनसुध्दा आपल्या उत्पादनांची जाहीरात अतीशय आक्रमकपणे करत आहेत. जोपर्यंत ही जाहीरात थांबणार नाही तोपर्यंत तंबाखूजन्य रोगांमुळे मरणार्यांचे प्रमाण कमी होणार नाही असे या अहवालात म्हटले आहे.
२०१२ साली विविध विकारांनी ६० लाख लोक मरण पावले. त्यातील ५० लाख लोक स्वतः व्यसन करणारे होते. व्यसन करत नसतानाही पॅसिव्ह स्मोकिंगमुळे म्हणजे सिगारेट ओढणार्याच्या जवळपास वावरल्यामुळे सहा लाख लोक मरण पावले आहेत. त्यामुळेच प्रत्यक्षात धूम्रपान करण्याइतकेच धूमप्रान करणार्यांच्या संपर्कात असणे, त्यांच्या आसपास वावरणे, शेजारी बसणे हेही धोकादाय आहे. असे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.