नॉटिंगहॅम- अशेस कसोटीत शेवटच्याच क्रमांकावर फलंदाजीला येवून ऑस्ट्रेलियाच्याच ऍश्टन ऍगरने पदार्पणातच ९८ धावा काढून १११ वर्षापूर्वी सर्वाधिक नाबाद ४५ धावांचा वार्विक आर्मस्ट्रॉंगचा विक्रम मोडीत काढला. त्याने १९०२ साली म्हणजेच १११ वर्षांपूर्वी सर्वाधिक नाबाद ४५ केल्याम होत्याल. गुरुवारी ऑसट्रेलियाची अवस्थाव बिकट झाली असताना डावखुरा फलंदाज फिलीप ह्युजेस व १९ वर्षीय ऍश्टन ऍगर यांनी अखेरच्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ६५ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने दुस-या दिवसअखेरीस २ बाद ८० धावा केल्या असून आता ते १५ धावांनी पुढे आहेत.
सामन्यारच्याप दुस-याच दिवशी जेम्स ऍण्डरसनच्या भेदक मार्या.समोर पाहुण्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद ११७ अशी बिकट झाली असतानाच डावखुरा फलंदाज फिलीप ह्युजेस व १९ वर्षीय ऍश्टन ऍगर यांनी अखेरच्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ६५ धावांची आघाडी मिळवून दिली. ऍगरने अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९८ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. ह्युजेस ८१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या २१५ धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात २८० धावा फटकावल्या.
पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे १४ गडी बाद झाले. तर दुस-या दिवशी दहा फलंदाज झाले आहेत. खेळपट्टीने रंग दाखवायला सुरूवात केल्यामुळे कसोटीचा निकाल पाचव्या दिवसाआधीच लागणार अशी चिन्हे निर्माण झाली. ऑस्ट्रेलियाने ४ बाद ७५ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. ह्युजेस व स्टीवन स्मिथ ही जोडी खेळपट्टीवर ठाण मांडून डाव सावरणार असे वाटत असतानाच ऍण्डरसनने स्मिथला ५३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथ बाद होण्याआधी ४ बाद १०८ अशा स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाची यानंतर अवस्था झाली ९ बाद ११७. मात्र ऑस्ट्रेलियन संघ या धक्क्यातून नुसता सावरलाच नाही, तर उभाही राहिला. ह्युजेस व ऍगर या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. ह्युजेसने १३१ चेंडूंत ९ चौकारांची बरसात केली, तर दुसरीकडे ऍगरने १०१ चेंडूंत २ षटकार व १२ दमदार चौकार चोपून काढले.