अमेरिकन कुत्र्यांची नाळ जुळते आशियाई कुत्र्यांशी

अमेरिकन वंशाच्या हजारो कुत्र्यांच्या जनुकांची तपासणी इव्होल्युशनरी जेनेटिक या केटीएच रॉयल इन्स्टिट्यूटमधील तंत्रज्ञान विभागातील संशोधकांच्या एका पथकाने केली असता त्यांना असे आढळले आहे की या कुत्र्यांचा मूळ वंश हा आशियातून आलेला आहे. एककाळ असा होता की ही स्थनिक अमेरिकन कुत्री नामशेष होण्याच्या मार्गावर होती मात्र नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात त्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असल्याचेही आढळले आहे.

अमेरिकेत युरोपियन लोकांचे आगमन झाले तेव्हा येथील स्थानिक कुत्र्यांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. स्थानिक अमेरिकन कुत्र्यांचे जतन, संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. पीटर सॅव्होलॉनियन या संशोधकाने या कुत्र्यांची जनुकीय तपासणी करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला तेव्हा त्यात या कुत्र्यांमध्ये ३० टक्केच युरोपियन कुत्र्यांची जनुके असल्याचे आढळले. मात्र आशियाई कुत्र्यांचे डीएनए अगदी पूर्वीच्या अमेरिकन जातींमध्येही लक्षणीय असल्याचे दिसून आले. त्यात पूर्व आशिया आणि सायबेरीन कुत्र्यांच्या जनुकांची संख्या अधिक होती. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचीही जनुकीय तपासणी पीटर यांनी केली तेव्हा त्यांच्यात मात्र अमेरिकन जीन्स अधिक प्रमाणात दिसून आले असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment