बनला…! जगातील पहिला 100 मेगापिक्सेल कॅमेरा

बीजिंग – तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत आहेत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत. त्यांनी नुकताच एक नवीन कॅमेरा बनवला आहे. 100 मेगापिक्सलचा या कॅमेर्‍याने जगातील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आत्तापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त किती मेगापिक्सेलचा कॅमेरा बघितला आहे? हा नवीन कॅमेरा 20 अथवा 30 मेगापिक्सेलचा नसून तर तब्बल 100 मेगापिक्सेलचा आहे. चीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांनी हा 100 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा तयार केला आहे. आयओ-3-कानबान असे या कॅमेर्‍याचे नाव आहे. ’चायना अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स’च्या म्हणण्यानुसार, हा कॅमेरा 10,240 व 10,240 पिक्सलचा फोटो क्लिक करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा कॅमेरा आकाराने फारच लहान म्हणजेच फक्त 19.3 सेंटीमीटरचा आहे. तसेच कमीत कमी शून्य ते 20 डिग्री सेल्सिअस तपमान किंवा 55 डिग्री सेल्सिअससारख्या उच्च तापमानातही फोटो काढू शकतो. चीनच्या एका संस्थेने उत्तम वाहतूक प्रणाली आणि आपत्ती देखरेखसाठी उपयोगात येणारा 100 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा बनवला आहे.

Leave a Comment