लंडन दि.११ – ब्रिटन युनिव्हर्सिटी मधील वैज्ञानिकांच्या पथकाने अंध व्यक्ती कानांच्या मदतीने पाहू शकतील असे उपकरण तयार केले असल्याचे दावा केला आहे. सेन्सरचा वापर करून बनविलेले हे उपकरण कोणत्याही वस्तूचे नांव ऐकताच त्याची प्रतिमा अंध व्यक्तीच्या मेंदूत तयार करू शकते. अर्थात त्यासाठी अंध व्यक्तींच्या मेंदूला थोडे प्रशिक्षित करावे लागते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अंध किवा दृष्टी अधू असलेल्या व्यक्ती आवाजाच्या सहाय्याने संबंधित वस्तूची प्रतिमा पाहू शकणार आहेत.
या बैज्ञानिकांनी डॉक्टर मायकेल प्रॅक्स यांचे सहाय्य या प्रयोगासाठी घेतले. या उपकरणाच्या मदतीने अंध व्यक्तीच्या डोळ्यांची तपासणी करताना असे निष्पन्न झाले की अंध व्यक्तींनी या काळात ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यावरून ते संबंधित वस्तूची प्रतिमा चांगल्या प्रकारे ओळखू शकल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या अंधांच्या मेंदूला त्यासाठी कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नव्हते. तरीही त्यांना अचूक वस्तू ओळखल्या. यावरूनच जर त्यांना प्रशिक्षण दिले गेले तर हा प्रयोग अधिक यशस्वी होईल आणि अंध कानांनी एकू शकतील असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.