नवी दिल्ली – मलेरिया, डेग्यूंची तपासणी आता कमी खर्चात करता येणार असल्याने मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांना आता मोठा आधार मिळणार आहे. दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांनी गणितीय समीकरणे तयार करुन एक सॉफ्टवेअर बनवले आहे. हे सॉफ्टवेअवर वापरून रुग्णाला कोणता ताप आला आहे हे केवळ एका तपासणीने कळते. तसेच ही तपासणी फक्त 200 रुपयात करता येणार असल्याने रुग्णांची विविध तपासण्यांद्वारे होणारी फसवणूकीला आळा बसणार आहे.
मलेरिया, डेग्यूंची तपासणी होणार अत्यंत कमी खर्चात
पावसाळा आला की घराघरात वेगवेगळ्या आजारांची सुरुवात होती. या आजारांच्या तपासणीसाठी डॉक्टर रुग्णांना अनेक चाचण्या करायला सांगतात. या सर्व तपासण्या करण्यात बिचार्या सामान्य माणसाचा खिसा खाली होतो. तर एवढे करुनही नेमका आजार कोणता हे ही लवकर समजत नाही. त्यात मलेरियाच्या तपासणीचा खर्च फ्कत 750 रुपये आहे तर डेग्यूंच्या तपासणीचा खर्च 4500 रुपये आहे. अशा परिस्थितीत योग्यवेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण ही बर्याच वेळा दगावतो.
भारतात तर अशी अनेक प्रकरणे पहावयास मिळतात. परंतु आता या सर्व लांबलचक प्रक्रियेवर दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांनी तोडगा काढला आहे. डॉ. मनोरमा भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली काही येथील डॉक्टरांनी गणितीय समीकरण तयार केले आहे.
या सॉफ्टवेअर बाबात सांगताना डॉ. भार्गव म्हणाल्या, की हे गणितीय समीकरण लॅबोरोटरी इनफॉर्मेशन सिस्टम सॉफ्टवेअरवर चालवून रुग्णाच्या रक्तातील लाल पेशींची तपासणी केली जाते आणि एका तासातच त्याला कोणता ताप आला आहे हे ही सांगितले जाते.’
या टेक्नॉलॉजीमुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचे लवकर निदान करणे सोपे झाले आहे. तसेच या तपासणीचा एकूण खर्च ही फक्त 200 रुपये आहे. त्यामुळे अगदी कमी खर्चात तापाचे निदान केले जाऊन लगेचच उपचारास सुरुवात करणे शक्य झाले आहे.
