अमेरिकन टायकून डोनाल्ड ट्रॅम्पचा पुण्यात निवासी प्रकल्प

पुणे दि.१० – अमेरिकेन रियल इस्टेट व्यावसायिक व सेलिब्रिटी डोनाल्ड ट्रॅम्पच्या कंपनीने त्यांच्या भारतातील व्यवसायाची सुरवात पुण्यापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांचा पहिला निवासी प्रकल्प पुण्यात आकारास येत असून तो २०१५ साली पूर्ण होईल असा अंदाज आहे.

या प्रकल्पात २२ मजली दोन टॉर्वस उभारले जाणार आहेत. त्यात ४४ आलिशान फ्लॅटस बांधले जाणार आहेत. ट्रॅम्प टॉवर्स असे या इमारतीचे नामकरण केले गेले आहे. हे ट्विन टॉवर अल्टामॉडर्न आहेत आणि त्यामुळे पुण्याची क्षितिजरेखा उजळून निघेल असे सांगितले जात आहे. लक्झरी, एलिगन्स देणारी निवासस्थाने बांधणारी कंपनी अशी ट्रॅम्प कंपनीची ख्याती आहे. अत्यंत आधुनिक वास्तुरचना हे त्यांचे वैशिष्ठ सांगितले जाते.

पाच बेडरूम्सच्या या आलिशान फ्लॅटना स्वतंत्र होम थिएटर रूमही दिली जाणार आहे तसेच पुण्याच्या परिसराचे ३६० अंशातून दर्शन घेणेही या घरांतून शक्य होणार आहे. फ्लॅटसती किंमत जाहीर केली गेलेली नाही. मात्र या इमारतींत बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याचे एक्स्ल्युझिव्ह फिटनेस सेंटरही असणार आहे.

आगाखान परिसरात आकारात येत असलेल्या या टॉवर्सचे विकसन पुण्यातील लिडींग रिअल इस्टेट विकसक पंचशील रिअॅलिटीकडे देण्यात आले आहे असेही समजते.

Leave a Comment