व्हेनेझुएलात आश्रय घेण्यास स्नोडेनची अनुमती

मास्को दि.१० – अमेरिकेतून अटकेच्या भीतीने मास्कोतील विमानतळावर मुक्काम टाकून असलेल्या एडवर्ड स्नोडेन याने व्हेनेझुएलात राजकीय आश्रय घेण्यास अनुमती दिली असल्याचे रशियन सांसदानी मंगळवारी जाहीर केले आहे. रशियाच्या आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष अलेक्सी पुश्कोव्ह यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे पोस्ट केले आहे.

राष्ट्रीय संरक्षण संस्थेतील गुप्त कागदपत्रे आणि माहिती वर्तमानपत्रांना पुरविल्याबद्ल एडवर्ड स्नोडेन अमेरिकेला हवा आहे. मात्र त्याने गेले कांही दिवस मास्को विमानतळाच्या ट्रांझिट झोनमध्ये आश्रय घेतला आहे. त्याला व्हेनेझुएला, बोलिव्हीया, निगारग्वा या देशांनी राजकीय आश्रय देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र स्नोडेनने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष माडुरी यांच्या आवाहनाला अधिक पसंती दिली आहे.

रशियातील सांसद पुश्कोव्ह यांनी सुरवातीला स्नोडेनने संमती दिल्याच्या वृत्ताला ट्विटर पोस्टचा हवाला दिला होता मात्र नंतर हा मजकूर बदलण्यात आला आणि स्नोडेनच्या निर्णयाची माहिती रशियन सरकारी टिव्ही चॅनल वेस्ट २४ वरून मिळाल्याची दुरूस्ती करण्यात आली असेही समजते. रशियानेही स्नोडेन जितक्या लवकर याबाबत निर्णय घेईल तितके ते रशियासाठी व त्याच्यासाठीही सोयीचे होईल असे मत यापूर्वीच व्यक्त केले होते.

Leave a Comment