‘एमपीएससी’चा डाटा करप्ट केल्याचे उघड

मुंबई: एप्रिल महिन्यात परीक्षेच्यापूर्वी काही दिवसा आगोदर एमपीएससी परीक्षेचा डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे परीक्ष काही काळ पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना हा परीक्षेचा डाटा कुणी तरी जाणूनबूजून करप्ट केला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. खुद्द एमपीएससीच्या अधिका-यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणूनच, काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. त्यामुळे आता हा डाटा करप्ट करण्यामागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

राज्यातील एमपीएससी परीक्षा सात एप्रिल रोजी होणार होती. त्या‍ परीक्षेपूर्वी पाच दिवस आगोदर दोन एप्रिलला एमपीएससी परीक्षेचा डाटा अचानक करप्ट झाला होता. त्यामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याषत आल्याह होत्या. त्या मुळे सर्वांसमोर मोठा पेच उभा राहिला होता. संगणकाचा सर्व्हरच करप्ट झाल्याने, विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म पुन्हा भरावे लागले होते.

या सर्व प्रकारानंतर राज्य सरकारने डेटा करप्ट कसा झाला, याचा तपास करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली होती. त्याच समितीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ ही परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणूनच, काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एमपीएससी प्रशासनाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असल्या चे समजते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केला जात आहे.

Leave a Comment