सोनिया, ओबामा, अन्सासरी राहतात चंद्रपूरमध्ये

चंद्रपूर: यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, अमिरेकेचे राष्ट्रपती बरका ओबामा, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी हे सर्वजण चंद्रपूर जिल्हातील राजूरा गावाचे रहिवासी आहेत. हे वाचून सर्वांना आश्चर्य वाटत असेल मात्र हे खरे आहे. हे नागरिक येथील रहिवासी असल्याचचा दाखला राजूरा नगरपरिषदेने दिला आहे. येथील नगरसेवकांनी या नावाची साधी शहनीशा न करता प्रमाणपत्रे देण्यानचा प्रताप केला आहे. अशा स्वरूपाची प्रमाणपत्रे देणा-या या नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.

राजूरा नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी रहिवासी प्रमाणपत्र देताना कोणतीही शहानिशा न करता या या नेत्यांच्या नावांची प्रमाणपत्रे दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या झोपडपट्टीत राहतात, असा उल्लेख या रहिवासी प्रमाणपत्रात आहे.

या प्रकरणाची चौकशी केली असता राजु-यातील नगरसेवक रमेश नळे, नगरसेविका शारदा डाहुले आणि पुष्पा कोडापे या नगरसेवकांनी चक्क कोरी प्रमाणपत्रे वाटून त्यांना हवी ती नावे लिहिण्याची मुभा दिली असल्यापचे समजते. या नगरसेवकांच्या प्रतापामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, सोनिया गांधी आणि बराक ओबामा ही सर्व बडी राजकीय मंडळी राजु-याचे रहिवासी झाले आहेत.

Leave a Comment