विशेष लोकांसाठी मॅग्नेटिक शर्ट

गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. पार्किन्सन, संधीवात, कंप यासार‘या व्याधींनी ग‘स्त असलेल्या लोकांना शर्टची बटणे लावणे हे मोठेच अडचणीचे असते याची कल्पना सर्वसामान्य लोकांना येणारही नाही. इतक्या किरकोळ आणि रोजच कराव्या लागणार्‍या या गोष्टीसाठी अनेकांना दुसर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. मात्र आता या लोकांची या अवलंबित्वातून सुटका होऊ शकणार आहे. डिझायनर असलेल्या आणि आता मॅग्ना शर्टच्या सीइओ मॉरा हॉर्टन यांनी यासाठी अगदी सोपी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

त्यांनी शर्टची बटणे व काजी शोभेपुरती ठेवली आहेतच. पण शर्टला मॅग्नेट लावले आहेत. शर्ट घालताना संबंधित व्यक्तीने हे मॅग्नेट फक्त एका रेषेत आणले की काम झाले. मॉरा यांचे पती व एनसी स्टेटचे फूटबॉल कोच डॉन हॉर्टन हे पार्किन्सनने ग‘स्त आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांना स्वतंत्रपणे आपला शर्ट बटणे लावून घालता आला पाहिजे. कारण सामना संपला की डॉनला अन्य खेळाडूच्या मदतीने शर्ट घालावा लागत असे. त्यांनी मॉराकडे असा शर्ट बनविण्याची विनंती केली आणि मॉरानेही पतीची इच्छा पुरविर्‍यासाठी ही मॅग्नेटची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. अर्थात यामुळे जगभरात अशा व्याधींनी त्रस्त असलेल्या लक्षावधी लोकांना शर्ट घालण्यासाठी तरी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागणार नाही हे काय कमी झाल !

Leave a Comment