जडेजा-रैना वादाची होणार चौकशी

नवी दिल्लीय- वेस्ट इंडिजमधील तिरंगी क्रिकेट मालिकेवेळी विडीज संघाविरुद्ध खेळत असताना मैदानावरच रविंद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यामध्ये वाद झाला होता. या दोघामधीलवादाची चौकशी करण्याचे आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांना दिले आहेत. श्रीधर हे वादाची चौकशी करून लवकरच बीसीसीआयला अहवाल सादर करणार असल्याचचे समजते.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सुनील नरिन यांचा झेल सोडल्या्नंतर जडेजा आणि रैना यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले होते. या वादाची गंभीर दखल बीसीसीआयने घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही घटना घडल्यानंतर लगेचच बीसीसीआयने श्रीधर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीचा अहवालही लवकरात लवकर देण्यासही सांगण्यात आले आहे.

हा अहवाल आल्यानंतरच नेमके मैदानावर काय झाले होते, याची कल्पना बीसीसीआयला मिळेल. सध्या मालिका सुरू असल्याने संघाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, असे आम्हाला वाटते. श्रीधर यांचा अहवाल आल्यानंतर या खेळाडूंवर काही कारवाई करण्याची आवश्यकता आहे का, याचा निर्णय घेतला जाईल, असे पटेल यांनी सांगितले.

Leave a Comment