गॅस, डिझेल दरात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होत असलेल्या घसरणीचा फटका येत्या काळात आता सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानी एकसष्ठी गाठली आहे. त्यामुळे महागाईने आधीच बेजार झालेल्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात घरगुती गॅस तब्बल १०० रुपयांनी तर महिन्याकाठी ५० पैशांनी वाढणारा डिझेल आता एक रुपयाने वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वारंवार घसरत जाणा-या रुपयांमुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तेल कंपन्यांना प्रतिलिटर डिझेलमागे साडेआठ रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे केंद्राकडून तेल कंपन्याना दर महिन्याच्या वाढीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

त्यासोबतच गॅसच्या सबसीडीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आगामी काळात घरगुती गॅसचा दर सिलेंडर मागे १०० रुपयांनी वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. अशास्वरूपाची भाववाढ झालीच तर सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

Leave a Comment