मुंबई दि. ८ – डॉलर्सच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरण कांही मर्यादेपर्यंत थोपविता यावी यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून डॉलर्सची विक्री सुरू केली असल्याचे वृत्त आहे. या संबंधात पाच ट्रेडर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल बँकेने डॉलर्सच्या तुलनेत रूपयाचे मूल्य ६१.०५ इतके झाल्यापासूनच डॉलर्स विक्री सुरू केली आहे तर अन्य दोन बँकांनी हे मल्या ६१.१५ वर गेल्यापासून डॉलर्स विक्री सुरू केली आहे.
सोमवारी सकाळी बाजार उघडताच रूपयाचे मूल्य आणखी घसरून ते ६१.२१ वर गेले. मात्र ही नीचांकी पातळी गाठण्याअगोदरच बँकांनी डॉसर्ल विक्री सुरू केल्याचे ट्रेडर्सचे म्हणणे आहे. अमेरिकेतील नोकर्यां चे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असून वर्तविण्यात आलेल्या अंदाजापेक्षाही हे प्रमाण खूपच अधिक आहे. परिणामी डॉलर आणखी मजबूत होत जाणार असा तज्ञांचा अंदाज आहे. याचा परिणाम रूपयाचे मूल्य घरसण्यात होत असून ही घसरण थांबवावी यासाठी डॉलर्स विक्री करणे हा एक मार्ग आहे असेही सांगितले जात आहे.