
नवी दिल्ली, दि.8 – स्मार्टफोन विश्वच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास-4 हा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. स्मार्टफोनमध्ये अनेक लोकप्रिय मोबाइल कंपन्यांच्या टक्कर देणार्या मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास-4 चे अभिनेत्री चित्रंगदा सिंहने लाँचिंग केले. पाच इंच एचडी टच स्क्रीन अससेल्या कॅनव्हास-4 मध्ये 1.2 जीएसझेड कोअर प्रोसेसर आहे. कॅनव्हास-4मध्ये एक जीबी रॅम असून त्याची इंटर्नल मेमरी 16 जीबीची आहे. ही मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात अँड्रॉइडचे अपडेटेट जेलीबीन म्हणजे 4.2 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.