महाविद्यालय, विद्यापीठात मोबाईलवर येणार बंदी

मुंबई, दि. 7 – महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या आवारात मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून या संबंधात उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या प्रमुखांना पत्र पाठवून त्यांची मते मागवून घेतली आहेत.

आम्ही ही बंदी घालण्याच्या विचारात आहोत. त्यावर आपली मते आम्हाला कळवावीत, असे आवाहन करणारे पत्र राज्य सरकारांकडून या संस्थांना पाठवण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात मोबाईल जामर आणि डिकोडर यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता आहे. तथापी हा मोबाईल बंदीचा विचार अगदी प्राथमिक स्तरावर असून त्यावर अजून कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही असेही संबंधीत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये शिकणारी मुले मोबाईल फोन व त्यातील कॅमेर्‍याच्या वापराने बदनामीकारक तसेच अश्‍लील स्वरूपाची छायाचित्रे आणि मजकूर शिक्षणसंस्थेच्या आवारातच एकमेकांना पाठवत असतात. त्यातून शिक्षणाचे वातावरण खराब होत असते. तसेच अन्यही गैरप्रकार यातून होत असतात. त्यामुळे अशी उपाययोजना करण्याची मागणी केली गेली आहे

 

Leave a Comment